गावातील सर्वसाधारण सुविधा

पाणीपुरवठा सुविधा
गावामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत गावामध्ये २ विहिरी काढण्यात आल्या आहेत व विहिरीवरती पाईप लाईन करुन गावामध्ये पाणिपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा व्यवस्थीत व्हावा यासाठी ग्रामपंचायती मार्फत एक कामगार नेमला आहे. गावामध्ये प्रत्येक गल्ली मध्ये ठरावीक वेळेसाठी पाणी सोडले जाते व नंतर पुढिल गल्ली मध्ये असे संपुर्ण गावाला दररोज पाणीपुरवठा केला जातो.
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहिर
घरगुती वैयक्तीक नळ जोडणींची संख्या 325
सार्वजनिक हातपंप (बोअर) 5
हातपंप संख्या

शासकिय आरोग्य सुविधा
गावामध्ये शासकिय आरोग्य सुविधा केंद्र नाही गावापासुन २ कि.मी. अंतरावर केखले गावामध्ये शासकिय प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्यल्प दरात उपचार केले जातात.

लाईटची सोय
संपुर्ण गावामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडुन विज पुरवठा केला जातो.
पथ दिवे (खांबांची संख्या) ११७
सोलरपद दिवे (खांबांची संख्या)
विद्युत जोडणी असलेल्या घरांची संख्या ७१३

वाचनालय
२००५ पासून गावांमध्ये वाचनालय चालू आहे. वाचनालयामुळे गावामधील स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणार्‍या मुलांना त्याचा फायदा होत आहे.

क्रिडांगण
गावामध्ये असणारे क्रिडांगण हे सुविधा व स्वच्छतेच्या अभावामुळे बंद पडले आहे. क्रिडांगणाचे क्षेत्रफळ सुमारे १ हेक्टर एवढे आहे.

दुरसंचार सेवा
BSNL, Airtel, idea, Vodafone, Uninor.

पेट्रोल पंप
गांवापासून ३ कि.मी अंतरावर असनार्‍या वारणानगर गांवामध्ये पेट्रोल पंप सुविधा आहे.

वाहतुकीची सोय
गांवामध्ये वाहतुकीसाठी ST ची सुविधा आहे.
वेळ वाहतुकिचे मार्ग
सकाळी ७.१५ कोडोली -गिरोली- कोल्हापुर
सकाळी ८.३० कोडोली -गिरोली- कोल्हापुर
सकाळी ११.१५ कोडोली -वाघबिळ- कोल्हापुर
दुपारी १२.१५ कोडोली -गिरोली- कोल्हापुर
दुपारी ३.०० कोडोली -गिरोली- कोल्हापुर

अवैध्य धंदे
देशी दारु दुकान आहे.
विदेशी दारु दुकान नाही.
मटका नाही.
वेश्या व्यवसाय नाही.