उत्सव - यात्रा/सण

महादेवाची यात्रा
गावामध्ये खुप प्राचिन काळातले महादेवाचे मंदिर आहे हे मंदिर गोपालेश्वर देवालय म्हणून ओळखले जाते. मंदिरामध्ये गेल्यावर त्याचे ती रेखिव कलाकृती पाहुन सामजते कि मंदिर खुपच प्राचिन काळातले आहे. या मंदिरामध्ये दत्त, विठ्ठल-रुक्मीनी, हनुमान, गणपती या देवांची स्थापना करण्यात आली आहे. हे गावामधील मुख्य दैवत मानले जाते या देवाची दरवर्षी नोव्हेंबर महिण्यामध्ये तुलशी विवाह दुसर्‍या दिवशी यात्रा आयोजीत केली जाते.
यात्रेचे फोटो

दिवाळी
गावामध्ये परंपरागत चालत आलेले सण उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये दिवळी हि मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दिवाळी दिवशी संपुर्ण गावभर रोशनाई केली जाते व फटाके फोडले जातात.

गणपती उत्सव
गावामध्ये गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गणपती उत्सव हा ९ दिवस असतो त्या दिवसामध्ये गावामध्ये प्रत्येक मंडळाकडून कार्यक्रमांचे आयोजन केले जाते नाटक, गाणी, कबड्डी स्पर्धा, संगित खुर्चा याप्रकारचे उपक्रम राबविले जातात. पुर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण झालेले असते.

दुर्गामाता उत्सव
गणपती उत्सवानंतर लगेच दुर्गामाता पुजन असते तो उत्सव गावामधील स्वुराज्य कला क्रिडा संस्कृतीक मंडळ साजरा करते. त्या रात्री गावामध्ये दांडीया चा कार्यक्रम आयोजित केला जातो.

इतर उत्सव